नवी दिल्ली: ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीनंतर नॅशनलिस्ट पार्टी ऑफ इंडिया, एनसीपीआय मध्ये विलीन झाल्याचं त्यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील बंडखोर खासदारांनी केंद्रातील सत्ताधारी एनडीएला पाठिंबा देण्याची घोषणा केली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार होणार्या कारवाई वाचण्यासाठी तृणमूलच्या बंडखोर खासदारांनी मध्ये विलीन होत असल्याचं जाहीर केलं. मात्र, फक्त दुसर्या पक्षात विलीन होत असल्याचं सांगितल्यानं पक्षांतर बंदी कायद्यानुसार खासदारकी वाचू शकेल असं होत नाही. तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार संविधानानुसार दिलेली विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करतात का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी दावा केला की त्यांनी एनसीपीआयमध्ये विलिनीकरण केलं असून त्यांना लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता हवी आहे. याशिवाय त्यांनी त्यांच्यासोबत दोन तृतियांश पेक्षा अधिक खासदार असल्याचं म्हटलं. दहाव्या अनुसूचीनुसार एखाद्या खासदारानं त्याचा पक्ष सोडला आणि दुसर्या पक्षात गेला तर त्याचं सदस्यत्व जाते. मात्र, विलिनीकरणाच्या पर्यायात दोन तृतियांश आमदार, खासदारांनी विलीन होण्याचा निर्णय घेतल्यास अपात्रतेपासून बचाव होऊ शकतो.
तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्त्वाचा दावा काय?
तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाच्या दाव्यानुसार फक्त खासदारांच्या गटाला दुसर्या पक्षात मान्यता मिळणार नाही. कायद्यात मूळ राजकीय पक्षाच्या विलिनीकरणाची तरतूद आहे. फक्त विधिमंडळ किंवा संसदीय पक्षाने वेगळे होऊन दुसर्या पक्षात जाणे पुरेसे नाही.
लोकसभेचे माजी सचिव पी.डी.टी. आचार्य यांनी जोपर्यंत खासदार तृणमूल काँग्रेसचे सदस्य आहेत, तोपर्यंत पक्षाचे विलिनीकरण अपेक्षित आहे. त्यामुळं खासदार दुसर्या पक्षात विलीन झाले तरी त्यांची खासदारकी वाचू शकत नाहीत. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये कोणत्याही एका गटाला मान्यता देऊ नये, असं म्हटलं. संविधानात देखील राजकीय पक्षात वेगळा गट निर्माण करण्याची परवानगी नाही, असं बॅनर्जी यांनी म्हटलं. अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्रात महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातील सुभाष देसाई यांच्या याचिकेतील निर्णयाचा दाखला दिला आहे. त्या निर्णयात स्वतंत्र गटाचा दावा आता करता येणार नाही असं म्हटलं. राजकीय पक्ष सर्वोच्च असून त्यांचा विधिमंडळ पक्ष नव्हे, असंही बॅनर्जी यांनी त्या निकालाचा दाखला देत म्हटलं.
ओम बिर्लांच्या निर्णयाकडे लक्ष
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आता निर्णय घ्यायचा आहे. तृणमूल काँग्रेसनं पक्षांतर बंदीच्या याचिका दाखल केल्यास ओम बिर्ला यांना विलिनीकरण वैध आहे का? संविधानिक अटींची पूर्तता झालीय का? हे ठरवावं लागेल किंवा पक्षांतर मानलं जाईल यासंदर्भातील निर्णय ओम बिर्ला घेतील.
तृणमूल काँग्रेसचे बंडखोर खासदार मध्ये विलीन होणार
ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी अचानक नॅशनलिस्ट पार्टी ऑफ इंडिया () मध्ये विलीन झाल्याचा निर्णय जाहीर केला आणि सर्वांना हा पक्ष कोणता असा प्रश्न सर्वांना पडला. या पक्षाने पहिल्यांदा २०२३ मध्ये पहिल्यांदा निवडणुकांमध्ये सहभाग घेतला आणि लढलेल्या दोन्ही जागी डिपॉझिटही जप्त झाले होते. या पक्षाचे संस्थापक शिवुली कुंडु असून ते मूळचे पश्चिम बंगालचे आहेत. हा पक्ष आसाम त्रिपुरा दोन्ही राज्यात सक्रीय आहे. या पक्षाला क्षेत्रिय पक्ष म्हणून मान्यता आहे तर पेनाची निब आणि त्यावर सात किरणं असा सिम्बॉल त्यांना मिळालाय. तसेच हा एनडीएचा सहयोगी पक्ष आहे.